राज्यात ३,२९७ नवे रुग्ण, २५ जणांचा मृत्यू

राज्यात ३,२९७ नवे रुग्ण, २५ जणांचा मृत्यू

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात ३,२९७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,५२,९०५ झाली आहे. राज्यात ३०,२६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,४१५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५ टक्के एवढा आहे.

राज्यात आज २५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३, पनवेल २, नाशिक २, जळगाव २, परभणी २, नागपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २५ मृत्यूंपैकी २१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज ६,१०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,७०,०५३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५१,६३,७८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५२,९०५ (१३.५४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६६,७८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: February 11, 2021 8:58 PM
Exit mobile version