राज्यात ३,५२४ नवे रुग्ण, ५९ जणांचा मृत्यू

राज्यात ३,५२४ नवे रुग्ण, ५९ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ३,५२४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,३५,६३६ झाली आहे. राज्यात ५२,९०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,५२१ वर पोहोचला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.

राज्यात ५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, नाशिक ५, पुणे ७, सोलापूर ५, सातारा ८, औरंगाबाद ४ आणि नागपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ५९ मृत्यूंपैकी २६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १९ मृत्यू गडचिरोली ५, गोंदिया ४, ठाणे २, औरंगाबाद १, बुलढाणा १, जळगाव १, नागपूर १, उस्मानाबाद १, रायगड १, रत्नागिरी १ आणि सातारा १ असे आहेत.

आज ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२८,२३,८३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३५,६३६ (१५.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८१,३०३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: January 1, 2021 7:28 PM
Exit mobile version