वर्ध्यातील वणा नदीत चार जण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, तिघांचा शोध सुरू

वर्ध्यातील वणा नदीत चार जण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, तिघांचा शोध सुरू

नागपूरच्या वर्धामधील हिंगणघाट येथे तोल जाऊन वणा नदीत चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरतालिका विसर्जन करण्याकरता गेलेल्या या भाविकांचा नदीमध्ये तोल गेला असल्याचे समजते. बुडालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश असून आज गणेश चतुर्थीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुडालेल्यांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जणांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे.

काय आहे घटना

राज्यात सर्वत्र गणेश चतुर्थीची धामधुम सुरू असताना आज, सोमवारी दुपारी वर्ध्यातील हिंगणघाट येथे ही दुर्घटना घडली. हिंगणघाट येथे वणा नदीत हरतालिका विसर्जन करताना दोन महिला आणि दोन लहानग्यांचा तोल गेल्याने हे चौघेही नदीत बुडाले. त्यामुळे नदीवर आलेल्या इतर महिलांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलवले. त्यानंतर नदीत बुडालेल्या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. यावेळी एका महिलेचा मृतदेह नदीतून काढण्यात पोलिसांना यशही आले. मात्र आणखी एक महिला आणि दोन लहानग्यांचा शोध सुरू आहे.

First Published on: September 2, 2019 6:53 PM
Exit mobile version