काखेत कळसा, गावाला वळसा; पिंपरी चिंचवडमध्ये हरवलेल्या मुलाच्या शोधाची कथा

काखेत कळसा, गावाला वळसा; पिंपरी चिंचवडमध्ये हरवलेल्या मुलाच्या शोधाची कथा

आरोस मस्केला शोधण्यासाठी पोलिसांची फौज

पिंपरी – चिंचवड येथे चार वर्षांचा चिमुकला बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आरोस समाधान मस्के (४) असे या चिमुरड्याचे नाव होते. मुलगा बेप्पता झाला असल्याची माहिती त्याच्या घरातल्यांनी तातडीने वाकड पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील या चिमुरड्याला शोधण्यासाठी शोधमोहिम हाती घेतली. या तपास पथकात १० पोलीस अधिकारी आणि ९० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र सर्व ठिकाणी शोधून देखील पोलिसांना मुलगा काही सापडला नाही. अखेर चार तासाने घराच्या पाठीमागील शौचालयातून रडण्याचा आवाज आल्याने पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली असता हा चिमुरडा शौचालयातच असल्याचे आढळून आले.

नेमके काय घडले?

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात आरोस मस्के (४) हा चिमुरडा अचानक बेप्पता झाला. आपला मुलगा खूप वेळ नजरेस न आल्याने आरोसच्या कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र तरी देखील आरोस कुठेही नजरेस न आल्याने अखेर आरोसच्या कुटुंबाने तत्काळ वाकड पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी देखील १० पोलीस अधिकारी आणि ९० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोधमोहिम हाती घेतली आणि अखेर चार तासाने चिमुरडा घराच्या पाठीमागील शौचालयामध्ये सापडला.

घरामागे असलेल्या शौचालयामधून आरोसची सुटका करण्यात आली.

रडला म्हणून सापडला

हा चिमुरडा चार तास शौचालयामध्ये रडत बसला होता. मात्र शौचालयाच्या आजूबाजूला कोणीही उपस्थित नसल्याने या चिमुरड्याचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. मात्र अचानक पोलिसांना लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर पोलिसांनी शौचालयाचे दार ठोकले. परंतु आतून दार उघडले गेले नसल्याने हा मुलगा आत अडकल्याचे समोर आले. अखेर आई, वडिलांनी आरोसला पाहताच सुटकेचा श्वास घेतला.

First Published on: September 29, 2018 6:58 PM
Exit mobile version