गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना

गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना

गेली दोन वर्ष कोरोनाचं संकट असल्याने मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यासाठी अनेक कोकणवासी गावी जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी मुंबई भाजपाच्या वतीने ५०० बसेस शनिवारी कोकणात रवाना झाल्या. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ३० बसेस रवाना झाल्या. तब्बल २० हजाराहून अधिक प्रवाशांना भाजपाने मोफत प्रवास उपलब्ध करून दिला आहे. (500 buses from Mumbai BJP to Konkan for Ganeshotsav)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली.


हेही वाचा – दसरा मेळावा शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे

First Published on: August 27, 2022 10:24 PM
Exit mobile version