पुणे : दिवसभरात ५०१ रुग्णांची नोंद; तर १७ जणांचा मृत्यू

पुणे : दिवसभरात ५०१ रुग्णांची नोंद; तर १७ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात नव्याने ५०१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ६५४ वर गेली आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ५४५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

१५५ रुग्णांना सोडले घरी

दरम्यान, कोरोनावर उपचार घेणाऱ्या १५५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीस ८ हजार १०० रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात १०५ नवे रुग्ण

पुणे शहरा पाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात देखील नव्याने १०५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज ५५ जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची संख्या हा २ हजार १३४ वर पोहचली आहे. यापैकी, १ हजार ३०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ६२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

२४ तासांत ४ हजार १६१ जणांना मिळाला डिस्चार्ज

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून चिंतेत आलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यातील ४ हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ७३ हजार ७९२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ३ हजार ८९० नव्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत २०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६२ हजार ३५४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ९०० झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


हेही वाचा – सिव्हिल करोना कक्षात आता व्हिडिओ कॉलिंग सुविधा


 

First Published on: June 25, 2020 12:07 AM
Exit mobile version