नवीन वर्षाचा सूर्य पाहण्यासाठी लावण्या या जगात नाही

नवीन वर्षाचा सूर्य पाहण्यासाठी लावण्या या जगात नाही

पुण्यात चिमुकलीचा अपघात मृत्यू

…..लावण्या आज नवीन वर्षाचा पहिला दिवस पाहण्यासाठी या जगात नाही. कडलग कुटुंबाची ती सर्वात प्रिय होती. मात्र या सहा वर्षाच्या लावण्याचा सोमवारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तिच्या कुटुंबाला चटका लावणारी होती. लावण्या कडलग कुटुंबाची लाडकी आणि एकुलती एक मुलगी होती. आज तिच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. खेळकर अत्यंत गोड स्वभाव अस वर्णन तिच्या सोसायटी मधील नागरिक करतात.तिला चॉकलेट फार आवडायचे अस शेजारील काकू सांगतात पण सोमवारी अपघात झाला आणि ती कायमची आमच्या पासून दुरावली तिचा शेवटचा चेहरा देखील पाहायला मिळाला नाही. अस गहिवरून शेजारील काकूने सांगितले. दरम्यान, याघटने प्रकरणी चालक दिलीप खंडू शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

सोमवारी सहा वर्षीय लावण्याच्या आत्याचा विवाह संभारभ होता. त्यासाठी सकाळपासूनच आई चेतना, वडील सचिन आणि सहा वर्षीय लावण्या पिंपळे गुरव मधील त्याच्या घरी गेली होती. परंतु लावण्या आज कायमची आपल्यापासून दुरावणार हे तिच्या आई वडिलांना देखील माहीत नसेल. ज्ञानेश्वर पार्क येथे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लावण्या पाच ते सहा मुलांसोबत रस्त्याच्या कडेला चेंडू खेळत होती. त्याचवेळी घात झाला. तिला मोटारीने धडक दिली आणि या अपघातात लावण्या गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे कडलग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मावळत्या वर्षाचा सूर्य आणि उगवत्या वर्षाची पहाट पाहण्यासाठी ती या जगात नाही.

लावण्याचा वाढदिवस शेवटचा ठरला

गेल्या तीन महिन्यांपासून लावण्या आईसोबत मूळ गावी राहत होती. गेल्या काही दिवसांपासून चेतना यांची तब्बेत बरी नव्हती म्हणून त्या मूळ गावी गेल्या होत्या. परंतु त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्याने परत आल्या. परंतु नियतीला काही वेगळच घडवायच होतं. डिसेंबर महिन्यात लावण्याचा वाढदिवस झाला तो कडलग कुटुंबासाठी शेवटचा ठरला. तर दोन दिवसांपूर्वी लावण्याच्या आईचा वाढदिवस झाला तेव्हा लावण्याने शेजारील काकूंना आईचा वाढदिवस असून आम्ही बाहेर जेवायला जातोय अस ती म्हणाली होती, अशी आठवण शेजारील काकूंनी सांगितली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अवघी सोसायटी दुःखात असून वर्षाचा शेवटचा आणि पहिला दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही असं ही शेजाऱ्यांनी सांगितले आहे.

वेग मार्यदित ठेवावा

दरम्यान, भरधाव वेगात असणाऱ्या वाहनचालकांनी चिंचोळ्या गल्लीत वाहन चालवताना वेग मार्यदित ठेवावा जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत किंवा वाहन सुरू करताना वाहनांच्या खाली कोणी नाही ना याची खात्री करावी जेणे करून असे अपघात टाळता येतील. तसेच तेवढीच काळजी पालकांनी घ्यायला हवी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

First Published on: January 1, 2019 4:40 PM
Exit mobile version