Corona Update: राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद; २३१ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद; २३१ जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट ५५.६७ टक्के

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक जण कोरोनावर देखील मात करत आहे. आज राज्याचा रिकव्हरी रेट ५५.५६ टक्के इतका झाला आहे. तर आज ४ हजार ५०० जण बरे झाले असून आतापर्यंत १ लाख ४९ हजार ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजचा मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

२ लाख ६७ हजार ६६५ पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार ९३९ नमुने घेण्यात आले असून यापैकी २ लाख ६७ हजार ६६५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर ४२ हजार ३५० व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – मुंबईत आज कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण, तर १,०११ जणांना डिस्चार्ज


 

First Published on: July 14, 2020 8:05 PM
Exit mobile version