CoronaVirus: कोरोनामुक्त गोव्यात सात कोरोनाचे नवे रुग्ण!

CoronaVirus: कोरोनामुक्त गोव्यात सात कोरोनाचे नवे रुग्ण!

कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज गोव्यात रॅपिड पीसीआर टेस्ट दरम्यान सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहेत. हे सात कोरोनाबाधित रुग्ण मुंबईहून गोव्याला आले होते. या कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसंच त्याचे नमुने गोवा मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

 

गोव्यात ३ एप्रिलला शेवटचा रूग्ण आढळला होता. १९ एप्रिल रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. मात्र आज पुन्हा ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोवा राज्यात कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत.

आज महाराष्ट्रात १ हजार ४९५ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २५ हजार ९२२वर पोहोचला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ४२२ रुग्ण हे आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५ हजार ५४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोना विषाणू नैसर्गिक नाही, त्याची निर्मिती प्रयोगशाळेत – नितीन गडकरी


 

First Published on: May 13, 2020 11:52 PM
Exit mobile version