घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोना विषाणू नैसर्गिक नाही, त्याची निर्मिती प्रयोगशाळेत - नितीन गडकरी

CoronaVirus: कोरोना विषाणू नैसर्गिक नाही, त्याची निर्मिती प्रयोगशाळेत – नितीन गडकरी

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना विषाणू संदर्भात एक मोठं विधान करताना म्हणाले की, कोरोना विषाणू नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे. नितीन गडकरी यांनी एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीशी बातचित करताना म्हणाले की, यावेळी आपण कोरोना विषाणूसह आर्थिक लढाई देखील लढत आहोत. भारत एक गरीब देश आहे. त्यामुळे आम्ही दर महिन्याला लॉकडाऊनची मुदत वाढवू शकत नाही. आपल्याला सुरक्षेच्या उपाययोजनांसह बाजारपेठा उघडाव्या लागतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत ते म्हणाले की, अमेरिका, ब्रिटन आणि इटली यासारख्या देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित स्थितीत आहे. तसंच कोरोनाबाधितांची संख्या देखील फार कमी आहे.

या कोरोना विषाणू विरोधाच्या युद्धात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसंच आपल्या कामगारांना अन्न आणि निवारा देण्याची जबाबदारी उद्योजकांची आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. कोरोना विरोधातील या युद्धामधील सर्वात मोठं आव्हान म्हणजे सकारात्मक राहणे आणि आत्मविश्वास राखणे हे आहे. असा विश्वास फक्त कामगारांमध्ये नव्हे तर सर्व बाजूंनी वाढवण्याची गरज आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७८ हजार ४२ वर पोहोचली आहे. यापैकी २ हजार ५५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच २६ हजार ३९२ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोना विषाणूचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्राला झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोना विषाणूने ग्रस्त झाली आहे.


हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात ५४ जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -