राज्यातील शेती, शेतकर्‍यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत

राज्यातील शेती, शेतकर्‍यांसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत

पावसाने हाहा:कार माजवल्याने महाराष्ट्रातील शेती आणि शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या शेतकर्‍याला दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतीसाठी आणि शेतकर्‍यांसाठी 70० कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्रसिंह तोमर यांनी पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी केंद्राने 70० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पीक विमा योजनेअंतर्गत 70० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली.

महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्राने आंतर मंत्रालयीन समिती बनवली, समितीने राज्यातील अधिकार्‍यांसोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 70० कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचे नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेत पाचव्या दिवशीसुद्धा सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना वारंवार कार्यवाहीत सहभागी होण्याचे आवाहन केले; पण प्रश्नोत्तराचा तास अनेक वेळा तहकूब करावा लागला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.

सभापतींना मध्यस्थी करण्यास भाग पाडले म्हणून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. कृपया आपल्या जागांवर परत या आणि कामकाजात भाग घ्या. आपण सरकारला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारू शकता. कृपया सहकार्य करा, अशी बिर्ला वारंवार विनंत्या करत होते.

गोंधळाच्या परिस्थितीत तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि हजारो कुटुंबांचे नुकसान झाले आहे. आम्हाला नुकत्याच आलेल्या पुरामुळे, विशेषत: शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा सखोल अहवाल मिळाला आणि त्याचे विश्लेषण केले आहे. गृह मंत्रालयाने ७०० कोटी रुपये मदत म्हणून मंजूर केले आहे, असे तोमर म्हणाले.

First Published on: July 28, 2021 4:28 AM
Exit mobile version