धक्कादायक! लातूरमध्ये एकाच दिवशी आढळले सर्वाधिक रुग्ण; मृतांचा आकडा ४८ वर

धक्कादायक! लातूरमध्ये एकाच दिवशी आढळले सर्वाधिक रुग्ण; मृतांचा आकडा ४८ वर

कोरोना विषाणू

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना लातूरमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात प्रलंबित राहिलेल्या १०७ अहवालामध्ये पुन्हा २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे १६ जुलै रोजी एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ८४ वर पोहोचली आहे. तर आजपर्यंत एका दिवसातली ही सर्वाधिक वाढ आहे.

१५ जुलैपासून संचारबंदी लागू

लातूर जिल्ह्यामध्ये १५ जुलैपासून कडकडीत बंद करण्यात आला आहे. मात्र, असे असताना देखील वाढत्या कोरोनाग्रस्त संक्रमित रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे लातूरकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मृत्यूची संख्या ४८ वर

कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत चार रुग्णांचा उपचारा दरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृत्यूची संख्या ४८ वर पोहोचली आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात आतापर्यंत ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लातूरमधील एकाचा पुणे येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता तर निलंगा या सामान्य रुग्णालयात एक आणि औसा मुलांची शासकीय शाळा येथील सेंटरमध्ये एक तर देवनी येथील शासकीय वसतिगृहातील सेंटरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३०८ नवे रूग्ण; २५८ जणांचा मृत्यू


 

First Published on: July 17, 2020 9:38 PM
Exit mobile version