घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात २४ तासांत ८,३०८ नवे रूग्ण; २५८ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात २४ तासांत ८,३०८ नवे रूग्ण; २५८ जणांचा मृत्यू

Subscribe

आज दिवसभरात २ हजार २१७ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३०८ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २५८ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९२ हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात २ हजार २१७ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ६० हजार ३५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत एकूण १ लाख ६० हजार ३५७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा ५४.८१ टक्के इतका झाला आहे. यासह राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१% एवढा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ (१९.४३ टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात आज एकूण १ लाख २० हजार ४८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १२१४ ९९१६४ ६२ ५५८५
ठाणे ३१६ ९८६५ १९७
ठाणेमनपा ३१५ १६५६३ ६३०
नवीमुंबईमनपा २६२ १२२६६ १४ ३३४
कल्याणडोंबवलीमनपा ४६१ १७१२२ १४ २७१
उल्हासनगरमनपा २४१ ५५०४ ९१
भिवंडीनिजामपूरमनपा ३८ ३२१४ १२ २१५
मीराभाईंदरमनपा २४१ ६८११ २२६
पालघर १३९ २२३६ २६
१० वसईविरारमनपा २५५ ९०५४ ११ २००
११ रायगड २५१ ५४४१ १०१
१२ पनवेलमनपा १५१ ५०१७ १०९
१३ नाशिक १९५ २०८२ ८६
१४ नाशिकमनपा २५२ ५३१६ १८ १८२
१५ मालेगावमनपा १९ १२४२ ८५
१६ अहमदनगर ३३ ६८४ २५
१७ अहमदनगरमनपा ५१ ५१४
१८ धुळे ३७ ९१० ४५
१९ धुळेमनपा ३१ ८६१ ३६
२० जळगाव ९० ५२०३ ३०८
२१ जळगावमनपा १७६३ ७३
२२ नंदूरबार ३२ ३५० १६
२३ पुणे २६६ ४८०४ १२८
२४ पुणेमनपा १५३९ ३५२१९ २१ ९७८
२५ पिंपरीचिंचवडमनपा ५६४ ९०१४ १७ १७६
२६ सोलापूर ११७ १३७१ ४८
२७ सोलापूरमनपा ६३ ३७१२ ३२९
२८ सातारा ८२ २१७३ ७५
२९ कोल्हापूर ६५ १४२२ २६
३० कोल्हापूरमनपा १८२
३१ सांगली ३७ ५९४ १३
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ३१ २१९
३३ सिंधुदुर्ग २६९
३४ रत्नागिरी ८७ १०९० ३५
३५ औरंगाबाद ८७ २२८६ ३९
३६ औरंगाबादमनपा १६८ ६९०९ ३२१
३७ जालना ८२ १२२८ ५४
३८ हिंगोली १५ ३८४
३९ परभणी २९ १६४
४० परभणीमनपा १३ १३७
४१ लातूर ५६ ५८६ ३३
४२ लातूरमनपा २२ ३८६ १४
४३ उस्मानाबाद ३२ ४६६ २३
४४ बीड ४० ३०७
४५ नांदेड २९९ १४
४६ नांदेडमनपा ४२७ २०
४७ अकोला २६ ४५१ २५
४८ अकोलामनपा १५१२ ७१
४९ अमरावती ११ १४७ १०
५० अमरावतीमनपा ४५ ९२७ ३३
५१ यवतमाळ ४९२ १६
५२ बुलढाणा ३१ ४७३ २०
५३ वाशिम १४ ३०१
५४ नागपूर ११ ४३६
५५ नागपूरमनपा ९५ १९७२ २१
५६ वर्धा ५०
५७ भंडारा १७६
५८ गोंदिया २२४
५९ चंद्रपूर १५१
६० चंद्रपूरमनपा ५०
६१ गडचिरोली १७१
इतरराज्ये /देश २२६ ३२
एकूण ८३०८ २९२५८९ २५८ ११४५२

 


दिलासादायक! भारतात कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -