Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, आज ९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Corona Update: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, आज ९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आज जिल्ह्यात ९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ७६५वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ६ हजार ४९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ४ हजार ८६० जणांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या ४ दिवसांपासून औरंगाबादमध्ये जीवनाश्यक वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. गेल्या ४ दिवसांमध्ये झालेल्या अँटीजन टेस्टमध्ये ४०० विक्रे्त्यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती औरंगाबाद महापालिकेने दिली आहे. अँटीजन टेस्ट या २५ जुलैपर्यंत केल्या जाणार आहे. या अँटीजन टेस्टमध्ये ज्या विक्रेत्याचे अहवाल निगेटिव्ह येणार आहेत त्यांनाच अत्यावश्यक वस्तू विक्री करता येणार आहे. यासाठी महापालिकेतून निगेटिव्ह अहवाल आल्याचे एक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर त्याचं दुकान उघडता येणार नाही.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख २७ हजार ३१वर

मंगळवारी २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रुग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर मंगळवारी दिवसभरात २४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात ७ हजार १८८ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८२ हजार २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के एवढे झाले आहे.


हेही वाचा – Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाखांच्या उंबरठ्यावर!


 

First Published on: July 22, 2020 10:55 AM
Exit mobile version