देवेंद्र फडणवीसांची ‘त्या’ व्हिडिओद्वारे बदनामी, भाजपची तक्रार; ५ जणांवर गुन्हा दाखल

देवेंद्र फडणवीसांची ‘त्या’ व्हिडिओद्वारे बदनामी, भाजपची तक्रार; ५ जणांवर गुन्हा दाखल

नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकून बदनाम केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस बिटको रुग्णालयात गेले असता तिथल्य़ा उपस्थित लोकांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो शेअर केला. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अज्ञात इसमांनी फडणवीस यांना उद्देशून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडीओ फेसबुकवर प्रसारित केला. राजकीय तेढ निर्माण करण्यासह फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली. रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आल्याने या पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मी शहरात असतो तर तुम्हाला बघून घेतलं असतं.’ अशा शब्दांत संकेत भोसले याने गिरीश महाजन यांना उद्देशून स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून हा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. त्यात फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचं गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

First Published on: May 2, 2021 10:01 AM
Exit mobile version