नागपूरमध्ये कोरोना रुग्णालयाला आग; तीन जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये कोरोना रुग्णालयाला आग; तीन जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये कोरोना रुग्णालयाला आग; तीन जणांचा मृत्यू

नागपुरातील कोरोना रुग्णालयाला आग लागली आहे. या आगीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. साधारणत: ८.४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं.

रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग विझविण्याचं काम सुरु आहे. तसंच, या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं आहे. तर या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. याचबरोबर, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३ ते ४ रुग्णांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. २७ रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

First Published on: April 9, 2021 10:59 PM
Exit mobile version