नारायण राणेंच्या पत्नीसह मुलाविरोधात लुकआऊट नोटीस; कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप

नारायण राणेंच्या पत्नीसह मुलाविरोधात लुकआऊट नोटीस; कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचने लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. कर्जाची परतफेड न केल्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ३ सप्टेबरला ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडून आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. यामध्ये नीलम राणे सहकर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. तसंच, नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न केल्यानं डीएचएफएलने संबंधित एजन्सीकडे याची तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पुणे पोलिसांनी ही नोटीस जारी करुन एअरपोर्ट लूकआऊट सेलला पाठवली आहे.

 

First Published on: September 9, 2021 5:53 PM
Exit mobile version