शरद पवारांवर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी

शरद पवारांवर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आज सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांची तब्येत स्थिर असल्याचं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं.

शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली होती. दरम्यान, शरद पवार यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांची तब्येत स्थिर असल्याचं देखील नवाब मलिक यांनी सांगितलं.

शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. या अगोदर देखील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा देखील शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती व पित्ताशयाचा खडा काढण्यात आला होता.

 

First Published on: April 12, 2021 12:13 PM
Exit mobile version