भिवंडी इमारत दुर्घटनेत साडेचार वर्षांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू; बचावकार्य सुरुच

भिवंडी इमारत दुर्घटनेत साडेचार वर्षांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू; बचावकार्य सुरुच

 

ठाणेः भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत पाच वर्षांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. नवनाथ सावंत (३८), ललितादेवी रवीकुमार महंतो (२६) आणि सोनाकुमारी मुकेश कुमार कोरी (४.५), अशी मृतांची नावे आहेत.

या दुर्घटनेत ११ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुक्तार रोशन मन्सुरी, प्रेमकुमार रवीकुमार महंतो, प्रिन्सकुमार रवीकुमार महंतो, विकास मुकेश राजघर, उदयभान मुनीलाल, अशी उपचार सुरु असलेल्या जखमींची नावे आहेत.

ठाण्यातील भिवंडीच्या वलपाडा परिसरात तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत ४० ते ५० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली असता त्वरीत भिवंडी अग्निशामक दल, जवान, पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाउंडमध्ये आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास जी-2 ही इमारत कोसळली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साधारण तीन ते चार कुटुंब राहत होते. खालच्या मजल्यात कामगार काम करत होते. हे सारे जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ढिगार्‍याखालून एक महिला आणि लहान बाळाला बचाव पथकाने नुकतेच सुखरुप बाहेर काढले आहे. मात्र, अद्यात ढिगार्‍याखाली ३० ते ३५ जण अडकल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून वर्तवण्यात येत आहे.

ठाण्यातून सात ते आठ रुग्णवाहिका दाखल

या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने खबरदारी म्हणून ठाण्यातून सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसेच भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ढिगाऱ्याखालून काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष करण्याचे आदेश देताना, जिल्हा रुग्णालयातही एक कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिल्या आहेत.

सदर घटनास्थळी प्रांत अधिकारी, तहसिलदार-भिवंडी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-ठाणे महानगरपालिका, ग्रामसेवक-भिवंडी ग्रामीण,पोलीस उपायुक्त परिमंडळ-०२, भिवंडी पोलीस कर्मचारी, दंगल गृहस्थ पोलीस, शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडीचे कर्मचारी-१० रुग्णवाहिका, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान-०१ इमर्जन्सी टेंडर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) अधिकारी कर्मचारी ०१-आयशर टेम्पोसह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान-०१ बस वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी (ठाणे महानगरपालिक, ठाणे) उपस्थित आहेत.

सदर घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने सदर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकूण-09 रहिवाशांची सुटका करण्यात आली असून, त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.


हेही वाचा : सलग सुट्ट्यांमुळे ट्राफिक जाम; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी


 

First Published on: April 29, 2023 2:08 PM
Exit mobile version