घरमहाराष्ट्रसलग सुट्ट्यांमुळे ट्राफिक जाम; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांमुळे ट्राफिक जाम; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Subscribe

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई- गोवा महामार्गावरही वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण झाली. शाळांना सुट्टी पडली आहे.

Major traffic Jams on Mumbai- Pune Expressway Mumbai Goa highway: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई- गोवा महामार्गावरही वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण झाली. शाळांना सुट्टी पडली आहे. तसेच, विकेंड्स असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  ( Traffic jams due to consecutive holidays Heavy traffic jam on Mumbai Pune Expressway )

शनिवार, रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने आज ( शनिवार) भल्या पहाटेपासून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे जाम झाला आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी दहा मिनिटांचा ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरुन सोडली जात आहेत.

- Advertisement -

बोरघाटात वाहतुकीची कोंडी

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बोरघाटात कोंडी झाल्याचे पहायला मिळात आहेत. वाहने अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. खंडाळा घाटात मुंबई लेनवर अधूनमधून दहा मिनिटांता ब्लॉक घेऊन पुण्याकडे जाणारी वाहने मुंबई लेनवरुन सोडण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, राजकीय चर्चांणा उधाण )

- Advertisement -

अपघातांच्या संख्येत वाढ?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई- पुणे एक्सप्रेसवर अपघातांची संख्या वाढते आहे. दोन दिवसांपूर्वी आठ वाहनं एकमेंकांवर धडकून मोठा अपघात झाला होता. यात कुठलीही हानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय वाहतुकीची कोंडीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. दर आठ दिवसांतून येथे अपघात होत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -