विजयदुर्ग किल्ल्यावरून अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कडेलोट

विजयदुर्ग किल्ल्यावरून अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कडेलोट

मुंबईः अजित पवार यांच्या धर्मवीर विधानावरून भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिंधुदुर्गातसुद्धा काही ठिकाणी अजित पवार यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज विजयदुर्ग किल्ल्यावरून कडेलोट आंदोलन करण्यात आले आणि सज्जड इशारा ही देण्यात आलाय. महाराष्ट्रात राहून छत्रपती धर्मवीर संभाजीराजांबद्दलचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विधान आणि औरंगजेबावर प्रेम करणारे जितेंद्र आव्हाड यांनी जी काही वक्तव्ये केलीत, त्याचा मी निषेध केलाय. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, आता अजित पवारांना हे डोके कोणी दिले? ही अक्कल कोणी दिली, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केलाय.

तो अमोल कोल्हे जे बोलतो, पैसे घेऊन, वाचून ते सगळ्या गोष्टी करतात, खऱ्या नसतात, कुठेतरी अजितदादांना समजले पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच आम्हाला बोलायचं आहे, उभा महाराष्ट्र उभ्या देशाची जशी भावना आहे, मग परत अशी हिंमत केली तर फक्त आज पुतळ्यात कडेलोट केलेला आहे, भविष्यामध्ये शिवप्रेमी कुठल्या टोकावर जातील, याचा अंदाज अजित पवारांनी आता घ्यावा, असंही नितेश राणे म्हणालेत. त्यांना “धरणवीर” ही खरी पदवी दिलेली आहे. त्या धरणवीरांनी परत आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर कुठलंही अपशब्द काढू नये, नाहीतर भविष्यात महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्यांना फिरायला देतील का, याबद्दल थोडा अजित पवारांनी विचार करावा, असंही ते म्हणालेत.

या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व नाही, स्वतःचा बाप कोण आहे हे माहीत नाही, त्यांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कधीच कळणार नाही, ज्या नालायक संजय राऊतांनी आमच्या वंशजांचे पुरावे मागितले, ज्या मराठा मोर्चाला आमच्या माता भगिनींना मूक मोर्चा म्हणून हिणवलं, अपमानित केलं, त्यांच्या पक्षप्रमुखांकडून अजून काय अपेक्षा ठेवणार, अहो लाज वाटली पाहिजे, तो भगवा रंगाचा झेंडा फिरवताना तुम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल आस्था नसेल, त्यांच्यावर निष्ठा नसेल तर तुमच्यासारख्या नालायकांना महाराष्ट्रात ठेवावे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. हा खरं म्हटलं तर महाराष्ट्राने विचार करायला हवा, असंही नितेश राणे म्हणालेत.


हेही वाचाः चित्रपटगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेताय?, सर्वोच्च न्यायालय म्हणते…

First Published on: January 3, 2023 10:22 PM
Exit mobile version