अस्वस्थतेमुळे आदित्य ठाकरे यांचा विठ्ठल-रुख्मिनीच्या पूजेतून काढता पाय

अस्वस्थतेमुळे आदित्य ठाकरे यांचा विठ्ठल-रुख्मिनीच्या पूजेतून काढता पाय

आषाढी एकादशी महापूजा-पंढरपूर

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुख्मिनीची पूजा करत असताना पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी पूजेतून काढता पाय घेत थेट आपली गाडी गाठली. मात्र थोड्यावेळाने ते पुन्हा पूजेत सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे असे सहकुटूंब विठ्ठल रुख्मिणीच्या पूजेसाठी पंढरपूरला बुधवारी आले आहेत.

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीची पूजा करण्यात येते. या पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह हजर राहिले होते. पूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते मंदिरातून बाहेर पडले. आदित्य ठाकरे अचानक बाहेर आल्याने सुरक्षारक्षकांची धावपळ सुरू झाली. पण त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे कळताच सुरक्षारक्षकांकडून त्यांना पाणी देण्यात आले. गाडीमध्ये तब्बल 30 मिनिटे बसल्यानंतर त्यांना बरे वाटू लागल्याने ते पुन्हा मंदिरात आले आणि विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहिले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या पूजेवेळी देशाला कोरोनामुक्त करण्याचे आवाहन करत राज्यातील शेतकर्‍यांना शांती आणि समृद्ध करण्याची प्रार्थना केली.

First Published on: July 1, 2020 2:06 PM
Exit mobile version