‘अबकी बार आंबेडकर सरकार’; एमआयएमचा नवा नारा

‘अबकी बार आंबेडकर सरकार’; एमआयएमचा नवा नारा

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने ‘अबकी बार मोदी सरकार’ हा नारा दिला होता. त्यावर भाष्य करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी, तुम्ही अबकी बार मोदी सरकार म्हणत त्यांना निवडून दिले. २०१९ च्या निवडणुकीत आम्ही अबकी बार आंबेडकर सरकार, असा असा नारा देत निवडून येऊ, असा विश्वास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित संविधान सन्मान सभेत जलील बोलत होते.

वाचा : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप – एमआयएम युती

एमआयएम – भारिप युती

७० वर्षांपासून तुम्ही बोलत आहात आणि आम्ही ऐकून घेत होतो. पण आता हवा बदलणार आहे. आता आम्ही बोलणार आणि तुम्हाला ऐकावे लागणार आहे, असे जलील म्हणाले. ‘गेल्या ७० वर्षात सर्वात जास्त फसवणूक मुस्लिम समाजाची झाली. तुम्ही अबकी बार मोदी सरकार म्हणाला होता. परंतु अबकी बार आंबेडकर सरकार आमचा नारा आहे. दलित, वंचित, मुस्लिम एकत्र आले तर २०१९ ला आंबेडकरांचे सरकार येईल. मुसलमांना आणि दलितांना दुसऱ्या कोणी नाही, तर त्यांच्याच लोकांनी हरवले आहे. अनेकांनी आपल्या समाजाचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ पाहिला. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करत असाल, तर आज शपथ घ्या की प्रकाश आंबेडकरांना निवडून देऊ. तुम्ही सगळे प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभे राहिलात तर कोणी भिडे तुमच्यासमोर उभे राहू शकणार नाही, असेही इम्तियाज जलील यांनी यावेळी म्हटले.

लोकसभा २०१९ साठी केली युती 

लोकसभा २०१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन महत्त्वाच्या पक्षांनी एकमेकांसोबत हातमिळवणी केली. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने युती केली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनीच याबाबतची घोषणा केली असून २ ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद येथे जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्रित सभा घेतली.

First Published on: November 26, 2018 10:19 PM
Exit mobile version