जेलमधून पळाला आणि त्याचा खून झाला!

जेलमधून पळाला आणि त्याचा खून झाला!

मद्यप्राशन करण्यास विरोध करणाऱ्या इसमावर धारदार शस्त्राने हल्ला

गुन्हेगार टोळ्यांमध्ये भांडणं सुरू झाली की आपला जीव वाचवण्यासाठी हे गुन्हेगार सर्वात सुरक्षित म्हणून थेट तुरुंगाचा आधार घेतात, असं आपण हिंदी चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं आहे. पण नगरच्या कर्जतमध्ये अशीच एक सत्य घटना घडली आहे. एक अट्टल गुन्हेगार कारागृहातून पळून गेला आणि ज्या टोळीशी त्याचं आधी भांडण झालं होतं, त्याच टोळीतल्या लोकांनी त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये घडली आहे. त्यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले असून आता या गुन्हेगाराच्या मारेकऱ्यांना पकडण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

राहुलवर खून, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे

राजगुरूनगरच्या कारागृहामध्ये कुख्यात गुन्हेगार २४ वर्षांचा राहुल गोयकर शिक्षा भोगत होता. खंडाळा येथे राहणाऱ्या गोयकरवर नगर, पुणे जिल्ह्यात शेकडो गुन्हे दाखल होते. खून, मारहाण, दरोडा अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पण मागच्याच महिन्यात तो राजगुरुनगरच्या कारागृहातून फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावरच होते. मात्र, त्याच दरम्यान राहुलचा खूनच झाल्याचं वृत्त पोलिसांना मिळालं.


हेही वाचा – सायको किलरने केली आणखी ९ मुलींची हत्या, दिली गुन्ह्याची कबुली

जुन्या वादातून राहुलची हत्या

जेलमधून पळाल्यानंतर राहुल थेट त्याच्या गावी खंडाळ्याला गेला. पण तिथे राहुल गोयकरचा गावातल्या जुन्या भांडणावरून काही लोकांबरोबर वाद झाला. या वादाचं हाणामारीत रुपांतर झालं. यात काही जणांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याच्या डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून त्याची हत्या केली. राहुलची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला होता.

८ जणांविरोधात गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील खंडाळा गावात हा प्रकार घडला. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. यामध्ये भाऊसाहेब खंडेकर, बबन खंडेकर, हौसराव गोयकर, संतोष गोयकर, राजेंद्र चौधरी आणि तीन महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जणांचा तपास केला जात आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – प्रेमभंगातून दोन तरुणींची आत्महत्या
First Published on: November 22, 2018 8:19 PM
Exit mobile version