घरमुंबईप्रेमभंगातून दोन तरुणींची आत्महत्या

प्रेमभंगातून दोन तरुणींची आत्महत्या

Subscribe

गोरेगावमध्ये दोन तरुणींनी विहिरीत उडीमुळे मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही तरुणींनी प्रेमभंगातून हे पाऊल उचल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन तरुणींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडल्याचे समोर आले आहे. या दोन्हीही तरुणी १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत असल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन तरुणींनी प्रेंमभंगामुळे ही आत्महत्या केल्याच्या प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

गोरेगावमधील अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन तरुणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. या दोघी मंगळवारी सायंकाळी एका विहीरीच्या ठिकाणी गेल्या होत्या. आत्महत्या करण्यापूर्वी या दोन तरुणींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवला. तसेच या दोघींमधील एकीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला आणि त्या फोटोखाली ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’ असा मेसेजही लिहला असल्याचे समजते. हा प्रकार समजताच स्थानिकांनी त्यांना बाहेर काढले. या दोघींना तातडीने बाहेर काढून सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या तरुणींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

प्रेमभंगातून आत्महत्या?

या दोन्हीही तरुणींचा नुकताच प्रेमभंग झाला असल्याचे समोर आले आहे. या प्रेमभंगातूनच या तरुणींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रेमभंगातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – सज्जनगडावरुन प्रेमीयुगुलांची आत्महत्या

- Advertisement -

वाचा – प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबियांकडून जिवंत मुलीचे अंत्यसंस्कार

वाचा – होमगार्ड तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -