ट्रक आणि बसची जोरदार धडक; २५ जखमी

ट्रक आणि बसची जोरदार धडक; २५ जखमी

प्रातिनिधिक फोटो

सोमवारी (आज) पहाटेच्या सुमारास नांदेड-नागपूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला. नांदेड-नागपूर महामार्गावर असलेल्या आसना पूलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी मोठी होती की त्यामुळे बसमधून प्रवास करणारे २५ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात बस चालकलाही जबर मार लागला असून, सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच आल्याची माहिती मिळते आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगामध्ये एक ट्रक नांदेडच्या दिशेने जात होता. याचवेळी नांदेडहून येणाऱ्या एका बसला तो आदळला आणि काही अंतर तो बसला घासत घेऊन गेला. प्रवास करणारे प्रवाशांपैकी बहुतांशी प्रवासी हे शासकीय नोकरीमध्ये असून, कामाच्या निमित्ताने ते नागपूरला जात होते. मात्र, कुणाच्याही ध्यानी मनी नसताना अचानक पहाटेच्या वेळी हा अपघात घडला आणि त्यामध्ये बसचालकासह जवळपास २५ लोक जखमी झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड यांच्यासह अर्धापूर पोलीस आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तिथल्या लोकांकडून तसेच प्रत्यक्षदर्शींकडून पोलिसांनी अपघाताचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त बसची तसंच ट्रकची पाहणी केली आणि संपूर्ण अपघाताचा पंचनामा केला. या सगळ्यादरम्यान बसमधील जखमी प्रवाशांना लोकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. ट्रकचा चालक अपघतानंतर फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत असल्याचं समजत आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ नांदेड-नागपूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.


धक्कादायक :  तरुणांसोबत होत आहे ‘हनी ट्रॅपिंग’

First Published on: December 3, 2018 11:07 AM
Exit mobile version