घरदेश-विदेशधक्कादायक! युवकांसोबत होत आहे 'हनी ट्रॅपिंग'

धक्कादायक! युवकांसोबत होत आहे ‘हनी ट्रॅपिंग’

Subscribe

काश्मिरी तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी आता 'हनी ट्रॅपिंग'ची ही नवी पद्धत वापरली जात असल्याचं उघड झालं आहे.

जम्मू-काश्मीर येथील तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गट, त्यांना आता एका वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असल्याची माहिती समोर आली आहे. शस्त्रास्त्र एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी मदत म्हणून तसंच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचे मार्ददर्शक म्हणून काम करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गट जम्मू-काश्मीरमधील तरुणांचे ‘हनी ट्रॅपिंग’ करत असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मिरी तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी आता ‘हनी ट्रॅपिंग’ची ही नवी पद्धत वापरली जात असल्याचं उघड झालं आहे. यासंदर्भात समोर आलेल्या गुप्त माहितीनुसार, बंदीपूरमध्ये राहणाऱ्या सैयद शाझिया (३०) या तरुणीला २५ दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान सैयदची  फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर तिची अनेक खाती असून, काश्मीर खोऱ्यातील अनेक युवक त्या अकाउंट्सना फॉलो करत असल्याचं समोर आलं. शाझिया वापरत असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अ‍ॅड्रेसवर, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष ठेवून होते.

‘फेक’ अकाउंट्सवरुन व्हायचा सौदा

शाझिया तिच्या सर्व फेक अकाउंट्सवरुन अनेक तरुण मुलांशी संवाद साधत होती. या संभाषणादरम्यान ती त्यांना विशिष्ट ‘माल’ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवायला सांगायची. माल पोहचवल्यानंतर शाझिया त्या तरुणांना भेटण्याचं वचन द्यायची. थोडक्यात भेटीच्या बदल्याच माल पोहचवण्याचा एकप्रकारचा सौदा शाझिया सोशल मीडियावरुन करत होती. शाझियाला अटक होण्याच्या एक आठवडा आधी १७ नोव्हेंबरला, दहशतवादी श्रीनगरमध्ये शस्त्रं आणि दारूगोळा लपवून आणणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी आयसिया जान (२८) हिला श्रीनगरच्या सीमेवरील लावायपोरा भागात अटक केली. त्यावेळी तिच्याजवळून २० ग्रेनेड आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता. आयसिया जान हिचासारख्याच अन्य काही महिलाही या दहशतवादी गटांसोबत असून त्याही तरुणांना भुलवून दहशतवादाकडे आणण्याचं काम करत असल्याची माहिती शाझियाने चौकशीदरम्यान दिली.

- Advertisement -

‘ति’च्यावर होती पोलिसांची पाळत

लष्कर-ए-तोयबाचा खोऱ्यातील प्रमुख दहशतवादी अबू इस्माईल आणि छोटा कासीम या दोघांना पोलिसांनी सप्टेंबर २०१७ मध्ये ठार केले होते. याप्रकरणातही पोलिसांना आसिया जान या महिलेच्या नावाची टीप मिळाल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अबू इस्माईल आणि छोटा कासीम यांना उत्तर काश्मिरातील काही अज्ञात महिला या दोन दहशतवाद्यांना शस्त्रे व दारूगोळा पुरवत असल्याचं पोलिसांना कळलं होतं. या महिलांमध्ये आसियाचाही सहभाग असल्याचं चौकशीदरम्यान पोलिसांसमोप स्पष्ट झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -