घरमुंबई'या' कारणामुळे हार्बर मार्गावर अपघातात वाढ

‘या’ कारणामुळे हार्बर मार्गावर अपघातात वाढ

Subscribe

यंदा रेल्वे रूळ ओलांडताना एकूण ७७ जणांचा बळी गेला आहे यामध्ये ६६ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे, तर मागील वर्षी ७३ जण अपघातात मरण पावले.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करूनदेखील अपघातांचं प्रमाण आटोक्यात येताना दिसत नाही. नवी मुंबईतील हार्बरमार्गावर रेल्वे स्थनाकालगत संरक्षक भिंती उभारण्यात आलेल्या आहेत, मात्र तरी देखील यंदा मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वे रूळ ओलांडताना अपघातात मृत पावलेल्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. वाशी रेल्वे स्थानक हे नवी मुंबई शहराचे महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून नवी मुंबई मुंबई तसेच उपनगराना जोडली गेली आहे. वाशी रेल्वे पोलीस यांच्या अख्यारीत गोवंडी ते सीवूड तसेच वाशी ते रबाळे हा रेल्वे मार्ग आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१७ मध्ये १७२ तर सन ऑक्टोबर २०१८ पर्यंत १४८ जण रेल्वे अपघातात मृत पावले आहेत. तर दोन्ही वर्षात १२५ जण जखमी झालेले आहेत. यंदा रेल्वे रूळ ओलांडताना एकूण ७७ जणांचा बळी गेला आहे यामध्ये ६६ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे, तर मागील वर्षी ७३ जण अपघातात मरण पावले आहेत.

भिंती ठरतायत मृत्यूचं कारण ?

नवी मुंबई शहरातील अनेक स्थनाकात संरक्षक भिंती पूर्णपणे उभरण्यात आलेल्या नव्हत्या. नेरुळ, जुईनगर, वाशी सानपाडा, तुर्भे,कोपरखैरणे, घणसोली, राबाळे याठिकणी सर्रास प्रवशी लवकर ट्रेन पकडण्याच्या नादात रेल्वे रुळाचा वापर करीत होते. मात्र गेल्या सहा महिन्यापासून नेरुळ, जुईनगर, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, याठिकणी रेल्वे व सिडको यांनी ट्रॅकवरून सहज येर जऱ्या करणाऱ्या प्रवाशांना वचक बसावा याकरीता संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र काही ठिकाणी प्रवाशांनी या भिंती देखील तोडून तेथून रहदारी सुरूच ठेवल्याचे पहावयास मिळते. त्याचसोबत रेल्वे क्रॉसिंग,बाहेर उभे राहून लोंबकळणे, टपावर उभे राहून स्टंटबाजी,दरवाजातून पडणे, खांबाला आपटून मृत्यू अशा विविध घटनांत मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.

- Advertisement -

नवी मुंबईतील प्रत्येक स्थनाकात हीच स्थिती पहावयास मिळते. त्यात तुर्भे, दिघा येथील झोपडपट्टी भागात जनजागृती अभावी अधिक अपघात घडलेले दिसून आले आहेत. घणसोली स्थानकात बांधलेली भिंत दोन दिवसांत भिंत तोडून त्याठिकाणी पून्हा वर्दळ सुरू ठेवलेली आहे. अनेक उपाय योजना करून देखील प्रवाशांच्या बेजबाबदार पणामुळे त्यांना प्राणाला मुकावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -