पुणे-पाटणा विशेष उत्सव ट्रेनची अतिरिक्त फेरी

पुणे-पाटणा विशेष उत्सव ट्रेनची अतिरिक्त फेरी

central railway

दिलेल्या तपशिलानुसार पुणे-पाटणा विशेष उत्सव ट्रेनची अतिरिक्त फेरी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे-

०३३८१ विशेष उत्सव ट्रेन शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी पाटणा येथून सुटेल आणि
०३३८२ विशेष उत्सव ट्रेन रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पुणे येथून सुटेल.

वरील ट्रेनची अतिरिक्त फेरी सध्याची संरचना, वेळ आणि मार्ग इत्यादींसह चालेल.

आरक्षण: ०३३८२ विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेरीसाठी विशेष शुल्कासह बुकिंग २६ नोव्हेंबर २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

वरील विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.


हे ही वाचा – Maharashtra School Reopen : राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती


 

First Published on: November 25, 2021 6:29 PM
Exit mobile version