आपल्यापेक्षा लहान व्यक्तीच्या प्रगतीची अडचण वाटणे विचित्र, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

आपल्यापेक्षा लहान व्यक्तीच्या प्रगतीची अडचण वाटणे विचित्र, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा त्यांच्याच लोकांकडून विश्वासघात झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. बंडखोर आमदारांनी जे केले ते आम्हाला अपेक्षित नव्हते. प्रियजनांकडून फसवणूक होणे ही एक विचित्र गोष्ट आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरांनी हे सर्व केले. मी सर्व बंडखोर आमदारांचे त्यांच्या आदर्शांसाठी अभिनंदन करू इच्छितो, असे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझे वडील, माझे आजोबा आणि त्यांच्या वडिलांचा असा विश्वास होता की सत्ता आणि पैसा येतो आणि जातो. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मात्र, जर एक गोष्ट कधीही गमावू नये, ती म्हणजे प्रतिष्ठा आणि आदर. त्यामुळे आम्ही राजकारणात फक्त सेवा करण्यासाठी आलो आहोत. यापुढे काय घडते ते पाहू.

एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या परस्पर मतभेदांबाबत आदित्य ठाकरे यांनी मला माझ्या बाजूने असे काही दिसत नाही. पण जेव्हा एखाद्याला आपल्या पेक्षा लहानांच्या प्रगतीची अडचण येऊ लागते तेव्हा हे विचित्र आहे. विशेषत: जेव्हा आम्ही गेल्या 10-15 वर्षांपासून एकत्र काम करत आहोत. त्याशिवाय मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही.

मी कोणावरही टीका केलेली नाही. मला तसे राजकारण करायचे नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्याकडे कट्टर राजकारणी म्हणून कोणीही पाहू शकले नाही. याचे एक कारण हेही असू शकते की देशाच्या राजकारणात आमच्यासारख्या चांगल्या लोकांना स्थान नाही. मात्र, या सगळ्यात सर्वसामान्यांसाठी काम करणे, तरुणांच्या रोजगारावर बोलणे, हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणे चुकीचे असेल, तर हो आमची चूक झाली आहे. अडीच वर्षांत आम्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली आहे. ही आमची उपलब्धी होती.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्ह दरम्यान आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. फ्लोअर टेस्टपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला, त्यात त्यांचा पराभव निश्चित दिसत होता. सोमवारी रात्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि 21 आमदार सुरतला रवाना झाल्यानंतर त्यांनी लाइव्ह येऊन आपण पद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी पद सोडले नसले तरी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडून ते मातोश्री या निवासस्थानी रहायला गेले.

First Published on: July 1, 2022 12:16 PM
Exit mobile version