महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे ‘हे’ कटकारस्थान, आदित्य ठाकरेंची संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया

महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे ‘हे’ कटकारस्थान, आदित्य ठाकरेंची संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह महाविकसआघाडीच्या नेत्यांनी ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई असल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसंवाद यात्रेसाठी दौऱ्यावर असणाऱ्या आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते चिपी विमानतळावर माध्यामांशी बोलत होते.

आंदित्य ठाकरे काय म्हणाले –

आंदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेसाठी कोकणात पोहचले आहेत. ते शिवसेना बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांच्या सावंतवाडीत मेळावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर चिपी वमानतळावर पोहचल्यावर त्यांना पत्रकारांनी राऊतांच्या अटकेविषयी विचारले. त्यावर आदित्य ठाकरेंनी हे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे, अशी प्रतिक्रीया दिली.

अशी असेल आंदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा –

1 ऑगस्ट –

1.30 वाजता कुडाळ

12.30 वाजता सावंतवाडी

6.30 वाजता कोल्हापूर

2 ऑगस्ट  –

12 वाजता शिरोळ

3.15 वाजता पाटण

6.45 वाजता कात्रज

कोकणात आजचा दिवस राजकीय सोमवार  –

कोकणात आजचा दिवस राजकीय सोमवार आहे. आज शिंदे गाटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांतदा कोकण दौरा करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निलेश राणे नितेश राणे आणि प्रमोद जठार यांचा दौरा असून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

First Published on: August 1, 2022 1:03 PM
Exit mobile version