आदिवासी मंत्री सभागृहात चुकीचे उत्तर देऊन राज्याची दिशाभूल करतायत; वळसे पाटलांचा आरोप

आदिवासी मंत्री सभागृहात चुकीचे उत्तर देऊन राज्याची दिशाभूल करतायत; वळसे पाटलांचा आरोप

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा(adhiveshan2022) आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झलेले पाहायला मिळाले. सभागृहात सुद्धा अनेक महत्वाचे मुद्दे चर्चिले गेले. दरम्यान, महाराष्ट्रात कुपोषणाने मृत्यू झाला नाही हे संबंधित आदिवासी मंत्री सभागृहात चुकीचे उत्तर देऊन राज्याची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walase-patil) यांनी केला.  कुपोषणाने मृत्यू झालेल्या बालकांच्या प्रश्नावर बुधवारी चर्चा झाली मात्र ती अर्धवट असल्याने कुपोषणाने किती बालकांचा मृत्यू झाला याची सत्य आकडेवारी सभागृहात संपूर्ण माहितीसह आली पाहिजे यासाठी हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. त्यावर आज सभागृहात चर्चा झाली.

हे ही वाचा –  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधानांना विनंती

कुपोषणाने बळी गेले नाही असे उत्तर देणार्‍या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित तुम्ही चुकीचे उत्तर दिल्याबद्दल तुमच्या विरोधात हक्कभंग आणावा लागेल असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला.कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात या प्रश्नाचे उत्तर आरोग्य विभागाने द्यायला हवे होते असे मंत्री बोलत आहेत हा आरोग्य विभागाचा प्रश्न होता तर आदिवासी विभागाने स्वीकारला का? असा सवालही दिलीप वळसे पाटील(dilip walase- patil) यांनी करताना आदिवासी समाजाची थोडी तरी संवेदना ठेवून काम करावे असे आदिवासी विकास मंत्र्यांना ठणकावून सांगितले.

हे ही वाचा – पश्चिम रेल्वेवर धावणा-या एसी ट्रेन बंद करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली महाप्रबंधकांची भेट

राज्यात कुपोषणाने होणाऱ्या बालमृत्यूंच्या संदर्भात 2007 पासून एक पीआयएल कोर्टात सुरु आहे. कोर्टाच्या ऑर्डरमध्येदेखील राज्यात कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या बालकांचा आकडा देण्यात आला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर देण्यासाठी हा प्रश्न राखून ठेवला होता. पण राज्यात कुपोषणाने एकही मृत्यू झालेला नाही अशी भूमिका घेणे वस्तुस्थितीला धरून नाही. आदिवासी विकास मंत्र्यांनी सभागृहात मांडलेले उत्तर मागे घ्यावे, अशी मागणीही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(dilip walase-patil) यांनी विधानसभेत केली.

हे ही वाचा – शिंदे सरकारकडून शिवभोजन थाळीकडे दुर्लक्ष, अनुदान थकल्याने केंद्र चालकांवर आर्थिक संकट

 

Edited By – Nidhi Pednekar

First Published on: August 25, 2022 4:46 PM
Exit mobile version