बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

करोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र, लोकांना मास्क आणि सॅनिटायझरची गरज असल्याचे विक्रेत्यांनी हेरत महागडे, बनावट सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी आणले. दरम्यान, प्रशासनाने बनावट सॅनिटायझर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. त्यानूसार मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. आतापर्यंत राज्यातील २० ठिकाणी छापे टाकत सुमारे दिड करोडचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध  प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.


हेही वाचा – कौतुकास्पद: जिल्हा परिषदेचा शिक्षक जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या यादीत


अमरावती, औरंगाबाद, बृहन्‍मंबुई, कोकण विभाग, नाशिक, नागपूर, पुणे विभाग तसेच गुप्तवार्ता मुख्य व इतर विभाग यांच्यामार्फत आतापर्यंत १ हजार ७४८ ठिकाणी मास्क व सॅनिटायजर्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये विनापरवाना उत्पादित सॅनिटायजर्स, मुदतबाह्य सॅनिटायजर वर नवीन मुदतीचे लेबल चिटकवून विक्री करण्यात आल्याचे समोर आले. तसेच अवैधरित्या उत्पादित आणि खरेदी बिले सादर न करता माल विक्री साठी ठेवणे या प्रकारची अनियमितता या तपासणीत दिसून आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या छापेमारीत अंदाजे १ करोड ४१ लाख ११ हजार २८९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासह करोना आजार दूर करणारे आयुर्वेदिक औषधे व करोना प्रतिबंधक गाद्या या प्रकारच्या खोट्या जाहिराती करणारे, विक्री करणारे व या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, करोना विषाणूच्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्शवभूमीवर अन्न व औषध विभागाला सतर्क राहून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात नुकतीच सर्व औषध विक्रेत्या संघटनांचे प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्राहकांना सॅनिटायझर्स आणि मास्क योग्य त्या किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्व मेडिकलमध्ये मास्क आणि सॅनिटायजर्स उपलब्ध होतील. नागरिकांनी शासना दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या तसेच आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

First Published on: March 19, 2020 10:55 PM
Exit mobile version