घरमहाराष्ट्रकौतुकास्पद: जिल्हा परिषदेचा शिक्षक जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या यादीत

कौतुकास्पद: जिल्हा परिषदेचा शिक्षक जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या यादीत

Subscribe

सोलापूरमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना सर्वोत्तम ५० शिक्षकांच्या यादीमध्ये नामांकन मिळाले आहे.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे  ‘ग्लोबल टीचर प्राईझ’ जाहीर झाले आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांना नामांकन मिळाले आहे. ग्लोबल टीचर प्राईझमध्ये भारतातील तीन शिक्षकांची निवड झाली आहे. तर महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजितसिंह डिसले यांची या नामांकनामध्ये निवड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्ली येथील विनिता गर्ग आणि राजस्थान येथील शुवजीत पायने यांचाही या नामांकन यादीत समावेश आहे.

‘ग्लोबल टीचर प्राईझ’ मिळवणारे एकमेव जिल्हा परिषद शिक्षक

लंडनमधील वाकी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. १० लाख अमेरिकन डॉलर्स असे स्वरुप असलेल्या या पुरस्कारचा बहुमान मिळवणारे रणजितसिंह डिसले एकमेव जिल्हा परिषद शिक्षक ठरले आहेत. ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील पाच हजार मुलांची ‘पीस आर्मी’ तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे.

- Advertisement -

जगातील ७ वे शिक्षक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत ११ वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगासाठी ओळखले जातात. डिसले गुरुजींनी तयार केलेली क्युआर कोडेड पुस्तके ११ देशांतील १० कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते १५० हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील ७ वे शिक्षक ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -