वातावरणातील बदलामुळे हापूसच्या पिकावर प्रतिकूल परिणाम

वातावरणातील बदलामुळे हापूसच्या पिकावर प्रतिकूल परिणाम

वातावरणातील बदलामुळे हापूसच्या पिकावर प्रतिकूल परिणाम

गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या थंडीमध्ये आंब्याला चांगला मोहर आला आहे. मात्र ढगाळ वातावरण आणि सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात पडणारे दाट धुके अशा वातावरणामुळे फुलोऱ्याची गळती होत आहे. झाड मोहराने फुललेले दिसले, तरी प्रत्यक्षात फळधारणा कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांचा अपवाद वगळता काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले होते. सकाळी चांगलीच थंडी आणि त्याच्या जोडीने धुके असे वातावरण आहे. हवेतील या गारव्याचा हापूस आंब्याला चांगलाच फायदा झाला. हापूस आंब्यांच्या झाडांना नव्याने मोहोर येऊ लागला. वाढलेले थंडीचे प्रमाण आणि त्यातून झाडांना आलेला मोहोर यामुळे शेतकरी, आंबा बागायतदार सुखावले.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

गेल्या दोन दिवसांत मात्र वातावरणात अचानक बदल झाला. दुपारी उन्हाचा कडाका वाढला आहे. थंडीच्या जोडीने पडणारे धुके आणि ढगाळ वातावरण याचा प्रतिकूल परिणाम आंब्याच्या या मोहोरावर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मोहोराचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच, फळधारणा झालेल्या झाडावर पुन्हा नव्याने मोहोर आल्यास त्याचा झालेल्या फळधारणेवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे.

First Published on: February 15, 2019 8:41 PM
Exit mobile version