कोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांचे ‘ते’ ट्वीट्स चर्चेत, काय होती भूमिका

कोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांचे ‘ते’ ट्वीट्स चर्चेत, काय होती भूमिका

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरूवारी (ता. 11 मे) महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. सुप्रीम कोर्टाने निकालावरून तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले असले तरी शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे तेव्हा देण्यात आलेले निर्णय सर्व चुकीचे मात्र तेव्हा आलेले सरकार मात्र बरोबर यावरून देखील आता चर्चा सुरू झाली आहे. या निकालानंतर सर्वच राजकीय नेत्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. तर दुसरीकडे मात्र ठाकरे गट नाराज असल्याचा दाखवत नसला तरी या गोटात शांतता पसरली आहे. सु्प्रीम कोर्टाने या प्रकरणी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर मात्र शरद पवार यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाबाबत आता विविध चर्चा करण्यात येत आहेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांसहित बंडखोरी केली त्यानंतर शरद पवार यांनी काही महत्त्वाचे ट्वीट्स केले होते. त्या ट्वीट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली होती. ज्याबाबतची आता चर्चा करण्यात येत आहे. त्यावेळी शरद पवार यांनी सलग सात ट्वीट केली होती. तर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता राजीनामा दिल्याचा याआधी शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर कोर्टाने ज्या बाबींची नोंद केली आहे. त्याबाबत त्यांनी याआधीत भाष्य केलेले आहे. (After court verdict, Sharad Pawar’s ‘those’ tweets in discussion)

काय होते ‘ते’ ट्वीट्स?
“महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे.”

“सरकार अल्पमतात आहे की नाही, हे विधानसभेत सिद्ध होत असते. जेव्हा विधानसभेत फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा हे सरकार बहुमतात असेल, असा मला विश्वास वाटतो.”

“अशा प्रकारची स्थिती मी महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे. मला पूर्ण खात्री आहे की यावेळी देखील सरकार आपले बहुमत सिद्ध करेल आणि मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार चालेल हे संपूर्ण देशाला दिसेल.”

“एकनाथ शिंदे यांनी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील सर्व पक्षांची यादी आहे. या यादीत निवडणूक आयोगानुसार देशात सहा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे हे सहा पक्ष आहेत. काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिंदे यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे उरलेला राष्ट्रीय पक्ष कोणता ते सर्वांना माहीत आहे.”

“सूरत आणि आसाममध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करणारे जे लोक दिसले ते माझ्या परिचयाचे आहेत. सूरतमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील हे मराठी गृहस्थ आहेत. ते संसदेचे सदस्य असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांचा सूरतमधील व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा?”

“आसाममध्ये सबंध व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने केली. आसाम राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मदत करणारे राज्यात कुणी दिसत नसले तरी आसाममध्ये कोण काय करतंय हे सर्वांना दिसत आहे.”

“आसाममध्ये सबंध व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने केली. आसाम राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मदत करणारे राज्यात कुणी दिसत नसले तरी आसाममध्ये कोण काय करतंय हे सर्वांना दिसत आहे.” असे सात ट्वीट शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर केले होते.

सध्या कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्या तरी अस्तित्वात असलेले सरकार मात्र बरोबर आहे असे सांगून मोठा पेच निर्माण केला आहे. तर या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा राजीनामा देण्याचा निर्णय चुकला हे मात्र कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

First Published on: May 12, 2023 9:22 AM
Exit mobile version