राज ठाकरेंवर शिराळा कोर्टानंतर दुसरं अजामीपात्र वॉरंट जारी, प्रकरण काय?

राज ठाकरेंवर शिराळा कोर्टानंतर दुसरं अजामीपात्र वॉरंट जारी, प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण, पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा कोर्टानंतर आता दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीडमधील परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. राज ठाकरेंनी जामीन मिळवल्यानंतर कोर्टात गैरहजर राहिले आहेत. सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आता न्यायालयाकडून अजामीपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. राज मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज ठाकरेंविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शिराळा कोर्टाने आणि परळीच्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जामीन घेतल्यानंतर परळी कोर्टात सतत गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे न्यायालयाने १० फेब्रुवारीला अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. तसेच १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यामुळे जर राज ठाकरेंनी पुन्हा अनुपस्थिती लावली तर दुसऱ्यावेळी पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येईल. यापूर्वी सांगलीच्या शिराळा कोर्टानेसुद्धा अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरेंना सांगलीच्या शिराळा कोर्टात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2008 साली रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या अशी मागणी केली होती. या मागणीदरम्यान केलेल्या आंदोलनात राज ठाकरेंना अटक झाली होती. राज ठाकरेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तोडफोड आणि दगडफेक झाली होती. सांगली आणि बीडमध्ये याची तीव्र पडसाद उमटले होते.

खासगी आणि सरकारी मालमत्तांचे मोठं नुकसान देखील झाले होते. परळी पोलिसांनी या प्रकरणातील तपास पूर्ण करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होते. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसैनिकांना जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु राज ठाकरे न्यायालयात सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात परळी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणाचे सांगलीमध्येही तीव्र पडसाद उमटले होते.


हेही वाचा : एखाद्या लढाईत एखादा सेनापती नसला तर कोणी लढाई हरत नाही – वसंत मोरे

First Published on: May 6, 2022 12:40 PM
Exit mobile version