घरताज्या घडामोडीएखाद्या लढाईत एखादा सेनापती नसला तर कोणी लढाई हरत नाही - वसंत...

एखाद्या लढाईत एखादा सेनापती नसला तर कोणी लढाई हरत नाही – वसंत मोरे

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात भोंग्याविषयी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ४ तारखेपासून राज्यात वादळाचं वातावरण निर्माण झाल. यामध्ये भोंग्यांवरून अनेक मनसैनिक आक्रमक झाले. तर अनेक मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील नोटीशी बजावण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे या आंदोलनातून बाहेर असल्याचं दिसून आलं. एखाद्या लढाईत एखादा सेनापती नसला तर कोणी लढाई हरत नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

वसंत मोरे पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी दरवर्षी बालाजीला जातो आणि मी अक्षय्य तृतीयाच्या दरम्यानच जातो. हे नियोजन मी दीड महिन्यापूर्वीच केलं होतं. ज्यावेळी हा विषय सुद्धा नव्हता. त्यामुळे माझा हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. जवळपास १७ ते १८ वर्ष पूर्ण झाली मी तरूपती बालाजीला जातो. कोरोनाच्या काळात मला २ वर्ष जायला भेटलं नव्हतं. निवडणूक झाल्यानंतर मी जात असतो. निवडणूक मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान होणार असे संकेत होते. परंतु प्रत्येक निवडणूक पार पडल्यानंतर मी बालाजीला जात असतो.

- Advertisement -

मनसेचे नेते तुमच्या संपर्कात होते का?

मनसेचे नेते माझ्या संपर्कात होते. ज्यावेळी ठाण्याची सभा होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मला आदल्या दिवशी मुंबईला बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी मला ठाण्याच्या सभेला यायला सांगितलं. माझ्या घरात लग्नाचा कार्यक्रम असताना देखील मी सभेला उपस्थित राहिलो. कारण मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. यासाठी मी उपस्थित राहिलो. हा सर्व विषय माझा पहिलाच झालेला होता. मी एक माणूस असून मला सुद्धा भावना आहेत. त्यामुळे दरवर्षी बालाजीला जातो.

- Advertisement -

एखाद्या लढाईत एखादा सेनापती नसला त्यामुळे कोणी लढाई हरत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की, माझ्या अनुपस्थितीत सुद्धा आमचे महाराष्ट्र सैनिक, शहर अध्यक्ष आणि इतर विषय वगळता सर्व आमचा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होता. माझ्या प्रभागात आरती झाली नाही. कारण मुस्लीम बांधवांना सांगितल्यानंतर त्यांनी अजानचा आवाज पहिल्यापासूनच बंद केला. सकाळची सुद्धा अजान होत नाहीये. जी होती ती अंतर्गत होती. मात्र, मी राजमार्गावर आहे आणि मी राजमार्गावरच राहीन, असं वसंत मोरे म्हणाले.


हेही वाचा : लग्नाआधी महिला पोलिसाकडून होणाऱ्या नवऱ्याला अटक, काय आहे प्रकरण?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -