शिवसेना, भाजप पाठोपाठ आता काँग्रेसचाही राजकीय दौरा

शिवसेना, भाजप पाठोपाठ आता काँग्रेसचाही राजकीय दौरा

बाळासाहेब थोरात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. तर भाजप महाजनादेश यात्रा सुरु करणार आहे. शिवसेना आणि भाजपच्या पाठोपाठ आता काँग्रेसही राजकीय दौरा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. हा दौरा ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात मराठवाड्यापासून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील मतदारसंघामध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये आपला विजय व्हावा या दृष्टीकानाने काँग्रेस आता राजकीय दौरा करणार आहे.

हेही वाचा – काँग्रेसचा आता बरमोडा झाला आहे – रावसाहेब दानवे

काँग्रेस लढायला सज्ज

लोकसभा निवडणुकीचा प्रचंड मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यासोबतच महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात जोरदार कामाला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत उत्तर प्रदेशमधील सोनभद्र हत्याकांडाच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. बाळासाहेब यांच्या या आंदोलनातून काँग्रेसच्या मनोशक्तीचे अनुमान लावता येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने तयारी केली असली तरी काँग्रेसही कुठे कमी पडू नये, याची काळजी बाळासाहेब थोरात घेत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेपुढे काँग्रेसचे मोठे आव्हान असण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – सोनभद्र हत्याकांडावरून राजकारण तापले; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

First Published on: July 22, 2019 12:31 PM
Exit mobile version