मेरी खाकी नही दुँगी

मेरी खाकी नही दुँगी

प्रातिनीधीक फोटो

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अर्थात एसटीच्या सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीट वाटपाची कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. हा नवीन गणवेश शाळकरी मुलींच्या गणवेशासारखा असून, ग्रामीण भागात असा गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना कुचेष्टेला सामोरे जावे लागत असल्याने या वाहकांनी या गणवेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.हे गणवेश योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळ कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे. हा गणवेश निश्चित करताना काही मोजक्याच कामगार प्रतिनिधींना बोलावून संमती घेण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात हा गणवेश धारण केल्यानंतर अवघडल्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची भावना या वाहक व्यक्त करीत आहेत.

पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकी रंगाचा गणवेश होता. या गणवेशामुळे त्यांना आदर, सन्मान मिळत होता. खाकी गणवेश धारण करून कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना सुरक्षित वाटत होते. जनसामान्यात खाकी गणवेशाबद्दल निर्माण असलेला आदर या महिला भागांना प्राप्त होत होता.परंतु आता नवीन गणवेशाची प्रतवारी त्याचा रंग व ग्रामीण भागात असा पेहराव हा आत्मसन्मानाला बाधा निर्माण करणारा झाला आहे. त्यामुळे या नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी असून, ‘मेरी खाकी नही दुँगी’, अशी भूमिका वाहकांनी घेतली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील अनेक विभागातील महिला वाहकांनी नवीन गणवेशा ऐवजी पूर्वीचा खाकी गणवेशच द्यावा, अशी विनंती यापूर्वी करण्यात आलेली आहे.

First Published on: March 16, 2019 4:52 AM
Exit mobile version