कृषीमंत्री दादा भुसे कोरोना पॉझिटिव्ह

कृषीमंत्री दादा भुसे कोरोना पॉझिटिव्ह

शिवसेना नेते तथा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. ट्विट करत त्यांनी पॉझिटिव्ही असल्याचे जाहीर करत संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

सध्या प्रकृती चांगली असून, लवकरच बरे होऊन कामावर रुजू होणार असल्याचेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी. सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी लवकरच सेवेत रूजू होईल, असेही दादा भुसे यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

First Published on: December 30, 2020 4:46 PM
Exit mobile version