अहमदपूर तालुक्यात वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

अहमदपूर तालुक्यात वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

वाळू उपसा करण्यास बंदी असताना देखील लातूरमधील अहमदपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदपूर तालुक्यात वाळू उपसामुळे मन्याड नदी पात्रात वाळू उपसामुळे या पात्राची चाळण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल विभागाने धडक कारवाई करत वाहने ताब्यात घेतली असून २४ लाखाचा दंड आकारला गेला आहे. तसेच यापुढील काळात वाळू उपसा करताना अढळल्यास मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे तहसिलदार अरुणा संगेवार यांनी सांगितले आहे.


वाचा – वाळू तस्करांकडून स्मशानभूमीतच वाळू उपसा


मन्याड नदीत होत आहे वाळू उपसा

मन्याड नदी पात्रात वाळू होत असल्याची तक्रार या परिसरातील सरपंचानी केली होती. मात्र वाळू माफीयांमध्ये राजकारणीतील काही नेत्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाळू माफीयांनी पगार देऊन खबऱ्या देखील ठेवला होता. हा खबऱ्या महसूल विभागावर पाळत ठेवायचा. यामुळे महसूल विभागाला कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुले तहसीलदार संगेवार यांनी खबऱ्याला पकडून पोलिसाच्या हवाली केले होते.


वाचा – बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ७३ जणांवर कारवाई


अशी केली कारवाई

महसूल विभागाने मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाळू उपसा करणारा जेसीबी चालक पसार झाला. तर दोन ट्रक, चार हायवा, चार ट्रॅक्टर पकडण्यात आले. तसेच जेसीबी एका ट्रॅक्टक मालकाचा असल्यामुळे याला जादा दंड आकारण्यात आला असून त्याच्याकडून २३ लाख ७४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. यातील १५ लाख ७५ हजार रुपयाची रक्कम सोमवारी वसूल करण्यात आली आहे. या कारवाईच्या दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदाराच्या चुलत भावाचे ट्रॅक्टर पकडण्यात आले. यामध्ये १ लाख १७ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.


वाचा – विनापरवाना वाळू उपसा रोखण्यासाठी १५ ठिकाणी चेक पोस्ट


 

First Published on: November 27, 2018 5:32 PM
Exit mobile version