घरमहाराष्ट्रवाळू तस्करांकडून स्मशानभूमीतच वाळू उपसा

वाळू तस्करांकडून स्मशानभूमीतच वाळू उपसा

Subscribe

वाळू तस्करांवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप
वाळू तस्करांना वाळूचा साठा सापडला की ते संबंधित जागा कोणती आहे याचा कसलाही विचार न करता थेट वाळू उपसा करतात. याचा प्रत्यय आढळगाव ग्रामस्थांना आला. या ठिकाणी जुनी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीतून वाळू तस्करांनी वाळू उपसा सुरू केला आहे. या ठिकाणी कामगार तलाठ्याने वाळू उपशाचा पंचनामा केला, तरीही दुपारनंतर वाळू उपसा सुरू होता. या वाळू तस्करांवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप होत आहे.
भीमा आणि घोड नदीपात्रासह तालुक्यातील गावोगाव असणाऱ्या नदीपात्रांमधून वाळू उपसा सुरू आहे. तसाच वाळू उपसा आढळगाव येथेही सुरू आहे. ओढ्या-नाल्यामधील वाळू उपसा आता देवनदीच्या किनारी असणाऱ्या स्मशानभूमीपर्यंत सुरू झाला आहे. वाळू तस्करांनी वाळूसाठी थेट स्मशानभूमीच उकरल्याने गावातील काही मंडळींनी काल कामगार तलाठी यांना सोबत घेऊन स्मशानभूमी गाठली. तिथे उपसा केलेल्या वाळूचा पंचनामा करण्यात आला. कामगार तलाठी यांनीही वरिष्ठ कार्यालयास याबाबतचा अहवाल सादर केला.काही ग्रामस्थांनी महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. आता अधिकारी कारवाई करतील या आशेने ग्रामस्थ निघून गेले.
आढळगावचे माजी सरपंच देवराव वाकडे म्हणाले, वाळू तस्करांनी चक्क स्मशानभूमी उकरुन वाळूउपसा केला आहे. याबाबत महसूल विभागाला ग्रामस्थांनी माहिती दिली होती. मात्र कारवाईऐवजी ज्याने वाळूसाठा करून ठेवला होता तो वाळू भरून नेण्यासाठी हजर झाला. यावरून सगळी मिलीभगत असल्याचे स्पष्ट होते.
राजकीय नेत्यांचा पाठिंबा
श्रीगोंदा तालुक्यात वाळूउपसा नवीन नाही. अनेक मंडळी या वाळू व्यवसायात उतरली आहेत. त्यात राजकारणी मंडळीही अपवाद नाहीत. आढळगावच्या स्मशानभूमीत जो वाळू उपसा केला गेला, त्याचा वाळू तस्कर एका राजकीय नेत्याच्या विश्वासातील व्यक्ती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -