उपमुख्यमंत्री बोलताना बाकडे, टाळ्या वाजवतात आणि मुख्यमंत्री..; अजितदादा आणि फडणवीसांमध्ये जुंपली

उपमुख्यमंत्री बोलताना बाकडे, टाळ्या वाजवतात आणि मुख्यमंत्री..; अजितदादा आणि फडणवीसांमध्ये जुंपली

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपायला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बाकडे आणि टाळ्या वाजवण्यावरून जुंपली.

आज दोन सत्ताधारी पक्षांचे गेल्या १५ दिवसांचे प्रस्ताव होते. तसेच एक विरोधी पक्षाचा होता. उपमुख्यमंत्री बोलतात तेव्हा भाजपचे आमदार बाकडे आणि टाळ्या वाजवतात. परंतु एक आक्षेप तुमच्यावर आहे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. तेव्हा एकही भाजपचा आमदार टाळी वाजवत नव्हता. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते. परंतु जेव्हा मुख्यमंत्र्यांनी कोटींचे प्रस्ताव आणि गोष्टी सांगितल्या. तेव्हा किती जणांनी मिळून टाळ्या वाजवल्या. करोडो रुपयांच्या योजना सांगत असताना मुख्यमंत्री काय सांगायचे?, अधिकारी काम करत आहेत, मान्यता देणार आहेत आणि कालबद्ध कार्यक्रम करतोय. परंतु यावेळी हे काम मी करणार, असं थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहीजे, अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं.

बाकडे आणि टाळ्या वाजवण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांना प्रतित्युर दिलं आहे. आता खरं म्हणजे किती सुधारणा झाली आहे. तुमच्या काळात तीन पक्ष होते. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे आमदार बसायचे. बाकी दोन पक्षाचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा असेल तर काँग्रेसचे बसायचे. मागण्या मान्य करून देण्याकरिता त्या त्या मंत्र्यांवरील जबाबदारी असायची की, तुमचे आमदार उपस्थित ठेवा. आमच्याकडे असंही काहीही नाही. येथे सर्व भाजपवाले बसले आहेत आणि सेनावालेही बसले आहेत. बाकडे आम्ही प्रत्येकवेळी वाजवतो. पण तुम्ही सिलेक्टीव्ह ऐकायला लागलात, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केला.

ज्यावेळी आपण राज्याला घेऊन पुढे जात असतो. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, महिलांनाही प्रतिनिधित्व द्या आणि बाकीच्या जागाही भरा. त्या जागा ४३ केल्यातरी राहिलेले आमदार निघून जाणार नाहीत, तुम्ही काळजी करू नका. गोसेखुर्द प्रकल्पाला मनमोहन सिंग आणि शरद पवारांनी राजकीय प्रकल्पाची मान्यता दिली. गोसेखुर्द प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून फडणवीसांनी मार्ग काढावा, असं अजित पवार म्हणाले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याबाबत तुम्ही तुम्हालात जमिनीच्या पैशाचं काय केलं?, वास्तविक त्यांनी कुठल्यातरी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याच आहेत. मात्र, समृद्धी महामार्गावर एकही चार्जिंग स्टेशन, डिझेल पंप आणि पेट्रोल पंप नाही. ते करून घ्यावे, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य; विद्यमान मंत्र्यांची चौकशी करा, अजित पवारांची मागणी


 

First Published on: December 29, 2022 5:39 PM
Exit mobile version