‘अजित पवार म्हणतात मला, तिकिटच कापेन’ संतापलेल्या दादांनी भर सभेत दिला दम

‘अजित पवार म्हणतात मला, तिकिटच कापेन’ संतापलेल्या दादांनी भर सभेत दिला दम

अन अजितदादा भर सभेत कार्यकर्त्यांवर भडकले

घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सज्जड दम भरला. ‘आता जर घोषणा दिल्या तर तिकीट कापेन, अजित पवार म्हणतात मला’, असा इशारा दिला. शिरूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस देईल तो उमेदवार तुम्हाला निवडून द्यावा लागेल. असे आवाहन पवारांनी केलं. तेंव्हा इच्छुक उमेदवार माजी आमदार विलास लांडे च्या नावाने घोषणाबाजी केली. तेंव्हा आता काय बेंबीच्या देटापासून घोषणा देताय, २००९ साली तिकीट दिलं तेंव्हा काय केलं? असा प्रश्न उपस्थित केला. तरी घोषणाबाजी सुरूच राहिली, “मग संतापलेल्या अजित पवारांनी आता तिकीट कापेन. अजित पवार म्हणतात मला”, असं म्हणत कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.

हे वाचा – सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून नगरची जागा लढवणार?

पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत माजी आमदार विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाच्या घोषणा देत होते. तेव्हा विलास लांडे यांनाच कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. तरी देखील उत्साही कार्यकर्ते थांबायचं नाव घेत नव्हते. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर नुकतेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतलेले अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. त्यांच्याकडे शिरूर लोकसभा निवडणूकीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळेच सभेत खासदाराकीसाठी उत्सुक असलेले लांडे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना लांडे यांच्या कार्यकर्त्यानी पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी अजित पवार यांनी शांत बसण्यास सांगितले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यावर निर्णय घेतील त्यांनी कार्यकर्त्याना भाषणातून सांगितलं. परंतु काही उत्साही कार्यकर्ते लांडे यांचा जयघोष करत होते. त्यावेळी संतापलेल्या अजित पवार यांनी आता जर घोषणाबाजी केली तर त्यांचं तिकीतच कापून टाकतो, असा दम दिला. तेव्हा कार्यकर्ते शांत बसले. २००९ ला तिकीट दिलं तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात अस देखील पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.

First Published on: March 5, 2019 10:18 PM
Exit mobile version