जागा वाटपात यशस्वी झालो तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढू – अजित पवार

जागा वाटपात यशस्वी झालो तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढू – अजित पवार

जागा वाटपात यशस्वी झालो तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होऊ शकते, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न उपस्थि होत असताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसने आधीच जाहीर केलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, आजा अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी होणार की नाही असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. जिल्हापातळीवर परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्याला अधिकार द्यावा. एकट्याने लढवायची की आघाडी करुन लढायची हा निर्णय जिल्हा पातळीवर व्हावा, असं माझं मत आहे. जिल्हापातळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला यश मिळेल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी निर्णय घ्यावा, असं अजित पवार म्हणाले.

पवार-मुख्यमंत्र्यांची राजकीय भेट नाही – अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “पवारसाहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आज राजकीय चर्चा नाही. असती तर आम्हाला बोलवलं असतं,” असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, या विषयांवर झाली चर्चा


 

First Published on: September 9, 2021 4:58 PM
Exit mobile version