दि.बां.चा मान, भूमिपुत्रांचा सन्मान! सर्वपक्षीय कृती समितीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

दि.बां.चा मान, भूमिपुत्रांचा सन्मान! सर्वपक्षीय कृती समितीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मंत्री मंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे. त्याबद्दल दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले.

हेही वाचा – ठाकरे आता ऑन फिल्ड! पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार

यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई येथील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तीचा सन्मान केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. दि.बा.साहेबांचा विजय असो, दि.बा.साहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणांनी सह्याद्री अतिथीगृहातील सभागृह दणाणला होता.

हेही वाचा – शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज

फटाक्यांची आतषबाजीने स्वागत

पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालय येथे उत्तर रायगड भाजपच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला.

First Published on: July 16, 2022 7:49 PM
Exit mobile version