गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूंना परवानगी द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी

गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूंना परवानगी द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी

विदर्भ – सगळीकडे सध्या नवरात्रौत्सवाची धूम आहे. रविवारी वाजत-गाजत अंबामाता मंडपात विराजमान झाली. आज तिची मनोभावे पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी गरबा खेळण्यासाठी तरुणाही उत्साही आहे. मात्र, गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या आणि त्यासाठी गरबा खेळायला येणाऱ्यांचं आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

हेही वाचा – आजपासून आदिशक्तीचा जागर! घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली. पोलीस अधिकाऱ्यांशीही ते बोलणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली.

गरबा उत्सवात अनेक धर्मीय तरुण-तरुणी येत असतात. यामुळे हिंदू महिलांची आणि तरुणींची छेड काढली जाते. यामुळे लव्ह जिहादसारख्या घटना घडतात. अशा घटना घडू नयेत याकरता काळजी घेतलेली बरी, म्हणून विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केली.

हेही वाचा – नवरात्री उत्सवासाठी मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजनस्थळी उभे राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करतील, त्यामुळे आयोजन मंडळांनी आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावी असे आवाहन केले आहे.

First Published on: September 26, 2022 10:31 AM
Exit mobile version