चित्रपटाला आवाज देणारे तरी…, वंशजांचा दाखल देत आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

चित्रपटाला आवाज देणारे तरी…, वंशजांचा दाखल देत आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई – हर हर महादेव या ऐतिहासिक चित्रपटामुळे राज्यात गदारोळ सुरू आहेत. या चित्रपटात दाखवण्यात आलेले अनेक प्रसंग इतिहासाला धरून नाहीत, असा खुलासा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी केला आहे. काल पत्रकार परिषद घेत रुपाली देशपांडे यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला. हाच दाखला घेत राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात की, “हर हर महादेव या चित्रपटावर अखेरीस हा कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन चित्रपट नाही असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले.”

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

“आता तरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, की हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का?” असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.


बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज रुपाली देशपांडे यांनी काल पत्रकार परिषद घेत सिनेमातील अनेक प्रसंगावर आक्षेप घेतले. बाजीप्रभू देशपांडे हे भोर जवळच्या सुभेदार वाडी शिंदे या गावचे रहिवासी होते. पुण्यापासून ते ६० किमी अंतरावर राहत होते. त्यांचं मूळ आडनाव प्रधान होते. क्षत्रियांना शोभेल असा पराक्रम बाजीप्रभू देशपांडे यांनी केला आहे. आम्ही चित्रपट पाहिल्यानंतर आमचा आक्षेप नोंदवत आहोत, असं रुपाली देशपांडे म्हणाले.


हेही वाचा – पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, मनसेचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

रुपाली देशपांडे यांनी काय आक्षेप नोंदवले?

First Published on: November 17, 2022 9:45 AM
Exit mobile version