रायगड -रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, दुरुस्ती केल्यानंतरही झुकला खांब

रायगड -रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, दुरुस्ती केल्यानंतरही झुकला खांब

रायगड -रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, दुरुस्ती केल्यानंतरही झुकला खांब

सावित्री नदीवरील आंबेत पूल धोकादायक झाल्यामुळे पुन्हा बंद करण्यात आला आहे. सावित्री नदीवरील आंबेत पूल रायगड आणि रत्नागिरीला जोडतो. प्रशासनाकडून पूल धोकादायक झाल्यामुळे १२ कोटी खर्च करुन दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पुलाचे खांब झुकले असल्याचेसमोर आल्यामुळे वाहतुक पूर्ण बंद करण्यात आली आहे.

सार्वजनिक विभागाकडून धोकादायक आबेत पुलाचे दुरुस्ती काम करण्यात येत होते. हा पूल रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडतो. दुरुस्तीसाठी विभागाने एकूण १२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच या पुलावरची वाहतूक वर्षभरासाठी बंद ठेवण्यात आली होती. दुरुस्ती काम केल्यानंतर वाहतूकीसाठी पूल खुला कऱण्यात आला होता. परंतु आता पुन्हा या पूलाचे खांब झुकले असल्याचे समोर आले आहेत. पुलाचा वरचा भाग चांगला दिसत असला तरी खांब पश्चिमेच्या दिशेने झुकले आहेत. वाहतूकीदरम्यान दुर्घटना घडू नये यासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे.

सावित्री नदीवरील पूल तीन तीन तालुक्यांना जोडतो. वाहतूक पूर्णपणे बंद केल्यामुळे एसटी बसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि मोठी गैरसोय होणार आहे. नागरिकांना आता महाडमार्गाने प्रवास करावा लागणार आहे. स्थानिक नागरिकांकडून आंबेत पूलाच्या जागी नवीन पूल उभारण्याची विनंती करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. परंतु अद्याप या पुलाला मंजुरी मिळाली नाही.


हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणेंना अखेर जामीन मंजूर, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय

First Published on: February 9, 2022 4:21 PM
Exit mobile version